आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WEDDING PIX: TVच्या अकबरने थाटले लग्न, हत्तीवर स्वार होऊन पोहोचला लग्नस्थळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्नात नववधू सृष्टी नय्यरसोबत अभिनेता रजत टोकस)
मुंबईः 'जोधा अकबर' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत अकबराची भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकस खासगी आयुष्यात लग्नगाठीत अडकला आहे. 30 जानेवारी रोजी गर्लफ्रेंड सृष्टी नय्यरसोबत रजत विवाहबद्ध झाला. राजस्थानमधील प्रसिद्ध जनाना महल (उदयपूर पॅलेस) मध्ये रजत आणि सृष्टी शाही थाटात लग्नाच्या बेडीत अडकले. यावेळी संपूर्ण पॅलेसला लाइट्स आणि फुलांनी सजवण्यात आले होते.
रजत चक्क हत्तीवर स्वार होऊन लग्नस्थळी दाखल झाला. मालिकेत अकबराच्या भूमिकेसाठी परिधान करत असलेल्या कॉश्च्युमप्रमाणे रजतने लग्नासाठी ड्रेस तयार करुन घेतला होता. तर सृष्टीने लहेंगा-चोली परिधान केली होती. या लग्नात 'जोधा अकबर' या मालिकेतील काही निवडक कलाकार हजर होते.
रजत आणि सृष्टीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. सध्या रजतने मालिकेतून काही दिवसांची सुटी घेतली असून हनीमून साजरा करण्यासाठी तो बाहेर गेला आहे. divyamarathi.com कडून नवविवाहित दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रजतच्या लग्नाची खास छायाचित्रे...