आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा लवकरच आई होणा-या आमनाचे Wedding Photos, शाही थाटात अडकली होती लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमित आणि आमनाची लग्नातील छायाचित्रे)
मुंबई- 2003 मध्ये छोट्या पडद्यावरील 'कही तो होगा' मालिकेतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ लवकरच आई होणार आहे. ही बातमी तिच्या एका मित्राने एका प्रतिष्ठीत वेबसाइटला दिली आहे. या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, 'आमना गेल्या काही दिवसांपासून पाली हिल येथील एका डॉक्टरकडे चाचण्यांसाठीजात आहे. तिला याविषयी काहीच सांगायचे नाहीये. परंतु ती गर्भवती असून लवकरच गोड बातमी देणार आहे.'
दीड वर्षांपूर्वी झाले लग्न-
16 जुलै 1982 रोजी जन्मलेल्या आमनाचे लग्न निर्माता अमित कपूरसोबत झाले आहे. 27 डिसेंबर 2013 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. आमनाच्या संगीत, मेंदीपासून ते लग्न आणि रिसेप्शनपर्यंत सर्वच समारंभ मोठ्या थाटात पार पडले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी दोघांच्या लग्नात उपस्थिती लावली होती.
अमितने 'वन बाय टू' (2014), 'रॉक द शादी' आणि 'मै और चार्ल्स' या सिनेमांची निर्मिती केली आहे. निर्मात्या शबनम कपूरचा अमित मुलगा आहे. शबनम कपूर यांनी शाहरुख खान स्टारर 'दीवाना' या सिनेमाची निर्मिती केली होती.
लवकरच आई-बाबा होणा-या आमना-अमितच्या लग्नसोहळ्याची खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मेंदी, संगीत, लग्न आणि रिसेप्शनची ही खास छायाचित्रे...