(रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये भगवान रामच्या भूमिकेत अभिनेता अरुण गोविल आणि माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्रीदीपिका चिखालिया)
गुरुवारी (25 सप्टेंबर) घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. धार्मिक पात्र आणि मनोरंजन जगताचे जुने नाते आहे. अनेक वर्षांपासून पौराणिक कथांवर आणि पौराणिक पात्रांवर मालिका आणि सिनेमांची निर्मिती होत आली आहे.
रामायण, महाभारत आणि माँ दुर्गाची अनेक रुपे आत्तापर्यंत टीव्हीवर दिसली आहेत. टीव्ही आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पौराणिक पात्र साकारले आहेत.
अरुण गोविल
1977 मध्ये सिनेमांमधून करिअरला सुरुवात करणारे अभिनेता अरुण गोविल आजसुद्धा भगवान रामच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. 1986 मध्ये रामानंद सागर यांच्या महाभारत या मालिकेत त्यांनी रामाची भूमिका साकारली होती.
दीपिका चिखालिया
1965 मध्ये छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या रामायणमध्ये अभिनेत्री दीपिका चिखालिया झळकली होती. ही भूमिका तिच्या करिअरमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि अविस्मरणीय भूमिका ठरली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच आणखी काही पौराणिक भूमिकांविषयी...