आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन नवाथेपासून नरुला ब्रदर्सपर्यंत जाणून घ्या काय करत आहेत KBC चे विनर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कौन बनेगा करोडपती' (KBC) चा 9वा सिझन सुरू झाला असून सध्या या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. 28 ऑगस्ट 2017 पासून सुरू झालेल्या या शोची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. या शो इंग्रजी गेम शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनेयर' वरून प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आला होता. या शोचे 8 सिझन अमिताभ बच्चन यांनी तर एक शो शाहरुख खानने होस्ट केला होता.
 
या शोमध्ये अनेक सामान्य व्यक्तींना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यामुळेच या शोच्या अनेक विनर्सचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. या पॅकेजद्वारे आम्ही तुम्हाला केबीसीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक रक्कम जिंकलेल्या विनर्सबद्दल सांगणार आहोत. आता हे सर्वजण काय करत आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. 
 
हर्षवर्धन नवाथे
या शोमध्ये करोडपती बनण्यात यशस्वी झालेले पहिले नाव म्हणजे हर्षवर्धन नवाथे. 2000 साली या शोमध्ये एक कोटी जिंकणारे नवाथे हे एका रात्रीतून स्टार बनले होते. पण त्या सर्व झगमगाटामध्ये त्यांचे शिक्षण मागे राहिले. त्यांनी UPSC सोडले आणि MBA केले. आज ते एका मोठ्या कंपनीत काम करतात. त्यांना दोन मुले आहेत.

पुढील स्लाइडवर, सर्वात लहान करोडपती बनला आयपीएस अधिकारी.. इतर सिझनमधील विजेत्यांबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...