आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षांचे झाले 'संस्कारी बाबुजी', या अॅक्ट्रेसबरोबर होते अफेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीना गुप्ता आणि आलोकनाथ. - Divya Marathi
नीना गुप्ता आणि आलोकनाथ.
मुंबई - संस्कारी बाबुजी म्हणून प्रसिद्ध असलेले आलोकनाथ 61 वर्षांचे झाले आहेत. 10 जुलै 1960 ला दिल्लीमध्ये जन्मलेल्या आलोकनाथ यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या लोकांना फारशा माहिती नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर अॅक्ट्रेस नीना गुप्ताबरोबरचे त्यांचे अफेयर. आलोक कामाच्या निमित्ताने मुंबईत आले होते. तेव्हा स्ट्रगल करताना त्यांची ओळख नीना गुप्ता यांच्याशी झाली होती. लवकरच त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 

आलोक-नीना वेगळे होण्यामागचे कारण 
- आलोक आणि नीना यांच्या अफेयर आणि ब्रेकअपबाबत फारशी माहिती नाही. पण असे म्हटले जाते की, दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. त्यामुळे ते दोघे वेगळे झाले. 
- नीना आणि आलोक यांनी 'गांधी' (1982) आणि 'अंत' (1994) मध्ये एकत्र काम केले आहे. 

नीना यांचे अनेक अफेयर, पण आलोक यांनी केले लग्न 
ब्रेकअपनंतर नीना यांचे अफेयर म्युझिशियन शारंगदेव आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्याशीही होते. आलोकनाथ यांनी मात्र आई वडिलांच्या पसंतीने बिहारी तरुणी अंशु सिंहबरोबर लग्न केले आणि ते सेटल झाले. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आलोकनाथ यांच्या लाईफबाबात इतर काही गोष्टी.. 
 
बातम्या आणखी आहेत...