आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Deepika Padukone Proposed Salman Khan To Marriage

दीपिकाने सलमानला शोमध्येच केले प्रपोज, अमन वर्मा झाला EVICT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडियो : 'बिग बॉस'मध्ये सलमान खानला दीपिकाने लग्नासाठी प्रपोज
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुपरस्टार सलमान खानसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु त्याने हा प्रस्तान नाकारला आहे. दीपिका 'तमाशा' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी तिने वादग्रस्त शो 'बिग बॉस'मध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिने सलमानसोबत 'मटरगस्ती' गाण्यावर डान्ससुध्दा केला. सोबतच दोघांची धमाल-मस्तीसुध्दा दिसली. दीपिकाने गुडघ्यावर बसून सलमानला प्रपोज केले आणि माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले.
दीपिका म्हणाली, 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. विल यू मॅरी मी सलमान खान' मात्र, सलमानने दीपिकाला वर उचलून तिचे प्रपोजल नाकारले. यादरम्यान सलमान म्हणाला, 'दीपिका असो अथवा कुणीही असो. हे कधीच होऊ शकणार नाही.' अर्थातच सलमान कुठे ना कुठे संकेत देत आहे, की तो कधीच लग्न करणार नाहीये. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'तमाशा' 27 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. सिनेमात दीपिकाशिवाय रणबीर कपूरसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे.
अमन वर्मा झाला एव्हिक्ट-
रविवारी (22 नोव्हेंबर) 'बिग बॉस'च्या घरातून अमन वर्मा एव्हिक्ट झाला आहे. त्याच्या अचानक एव्हिक्शनमुळे होस्ट सलमान खान शॉक झाला. घरातील सर्व स्पर्धकसुध्दा हैराण झाले. अमनचा परफॉर्मन्ससुध्दा चांगला होता. मात्र अचानक शोमधून बाहेर पडणे आश्चर्याची बाब ठरली.
घरात नवीन वाइल्ड कार्ड एंट्री-
मागील आठवड्यात कंवलजीत सिंहने 'बिग बॉस'मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली. आता आणखी एका नवीन सदस्याची घरात एंट्री होणार आहे. सलमानने रविवारीच्या (22 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये या नवीन सदस्याची ओळख करून दिली. या सदस्याचे नाव आहे प्रिया मलिक. ती देहरादूनची आहे, परंतु ऑस्ट्रेलियामध्ये राहते. शिवाय ती 'बिग ब्रदर'च्या ऑस्ट्रेलिअन व्हर्जनची फायनालिस्ट होती. सोमवारी (23 नोव्हेंबर) ती नॉमिनेशनदरम्यान घरातील स्पर्धकांना भेटणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'मध्ये पोहोचलेल्या दीपीकाचे काही फोटो...