लाखो मनांवर राज्य करणारी 'मधुबाला' अर्थातच दृष्टी धामी लवकरच एका नवीन अवतारात दिसणार आहे. आतापर्यंत तिने आपल्या डान्स आणि अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. परंतु आता ती एक भाजी विकणारी होणार आहे. हो खरंच, दृष्टी लवकरच कलर्स चॅनलवर प्रसारित होणा-या 'मिशन सपने' या शोमध्ये दिसणार आहे. एक दिवसासाठी लिंबू आणि मिरच्या विकणा-या बाईचे आयुष्य जगणार आहे.
'मिशन सपने' हा शोमध्ये जगभरातील दिग्गज एक दिवस सामान्य माणसांप्रमाणे काम करतात. त्यामध्ये त्यांना जी कमाई होते त्याच्या शंभर पटीने शोमध्ये बोलवलेल्या गरजु व्यक्तीला दिली जाते.
एक प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, 'दृष्टी खूप क्रिएटीव्ह आहे. तिने जेव्हा रस्त्यावर लिंबू-मिरच्या विकणा-या आई-मुलीला बघितले तेव्हा तिने ठरवले, की एक दिवसासाठी ती हे काम त्यांच्यासाठी करणार आहे. तिने लिंबू-मिरच्यांची टोपली उचलली आणि विकायला लागली.'
यावेळी तिने आपल्या चाहत्यांसोबत रस्त्यावर डान्ससुध्दा केला. रस्त्यावर जाणा-या एका वृध्द जोडप्यासाठी तिने 'मधुबाला...' या मालिकेतील 'आर. के. मै तुमसे प्यार करती हूं' हा डायलॉग म्हणताना दिसली. एवढेच नाही तर, तिने त्या वृध्द जोडप्याला एकमेकांना प्रेमाचे तीन शब्द बोलण्यास सांगितले.
दृष्टीने येणा-या-जाणा-यासह आपली मैत्रीण निगार खानलासुध्दा लिंबू-मिरची विकली. एक दिवसासाठी लिंबू-मिरची विकणारी बनून दृष्टीने त्या गरजू आई-मुलीचे मन जिंकले.
आपल्या अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणा-या दृष्टीचा हा नवीन अवतार प्रेक्षकांना कितपत पसंत पडतो, हे शो प्रसारित झाल्यानंतरच कळेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा दृष्टीचा हा नवीन अवतार...