आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Kriti Sanon Became Aishwarya Rai For Salman Khan

BB9: ऐश्वर्या बनून कृतीने सलमानसोबत री-क्रिएट केला 'हम दिल दे चुके सनम'चा सीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस'च्या सेटवर वरुण धवन आणि कृती सेनन
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन अलीकडेच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 9' (BB9)च्या सेटवर पोहोचली होती. यावेळी तिने सुपरस्टार सलमान खानसोबत 'हम दिल दे चुके सनम'चा एक सीन रि-क्रिएट केला. या सीनमध्ये तिने सिनेमातील नंदनी अर्थातच ऐश्वर्या रायची भूमिका साकारली. दोन्ही स्टार्सची मजेदार केमिस्ट्री पाहायला मिळाली.
यावेळी कृतीसोबत अभिनेता वरुन धवनसुध्दा उपस्थित होता. दोन्ही स्टार्सनी 'दिलवाले' या आगामी सिनेमाचे प्रमोशन केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' सिनेमात वरुण, कृतीसह शाहरुख खान आणि काजोलसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा याच वर्षी 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचलेल्या कृती आणि वरुणचे फोटो...