आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनी मोठ्या 'भाभीजी'च्या प्रेमात पडला होता हा अभिनेता, या कारणामुळे मोडले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शिंदे, रोमित राज - Divya Marathi
शिल्पा शिंदे, रोमित राज
'घर की लक्ष्मी बेटियां' (2007-09) आणि 'मायका' (2007-09) या गाजलेल्या मालिकांमध्ये झळकेलला अभिनेता रोमित राज 37 वर्षांचा झाला आहे. 2012 साली रोमितचे लग्न टीना कक्कडसोबत झाले. या दाम्पत्याला रिया नावाची एक मुलगी आहे. रोमित राजच्या भूतकाळाविषयी सांगायचे झाल्यास, त्याचे अफेअर 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदेसोबत होते. विशेष म्हणजे दोघांचे लग्न ठरले होते, लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या होत्या. 

2009 साली होणार होते दोघांचे लग्न... 
-  2009 साली शिल्पा आणि रोमितचे लग्न होणार होते.लग्नपत्रिका छापल्या गेल्या होत्या. विवाहस्थळ निश्चित झाले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवसाआधी शिल्पाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
- शिल्पा (39 वर्षे) आणि रोमित राज 'मायका' आणि 'माता-पिता के चरणों में स्वर्ग' या मालिकांमध्ये एकत्र काम केले होते. 
- 'मायका' या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. 
- दोघांमध्ये प्रेम जुळले आणि त्यांचे लग्नही ठरले. 29 नोव्हेंबर 2009 रोजी गोव्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडणार होता. 
- शिल्पाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, दोघांच्या लग्नाच्या पत्रिकासुद्धा छापल्या गेल्या होत्या. मात्र नंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की तिने स्वतः लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

अखेर काय होते कारण...
- शिल्पाने लग्न न करण्यामागचे कारण एका मुलाखतीत सांगितले होते. 
- शिल्पाने सांगितल्याप्रमाणे, रोमित एक अॅडजस्टिंग हसबंड होऊ शकणार नाही, असे तिला वाटले. 
- शिल्पाने रोमितला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. मात्र रोमितने शिल्पाची गोष्ट समजून न घेता तिच्या कुटुंबीयांचा अपमान केला. 
- या सगळ्या परिस्थितीमुळे शिल्पाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 
- शिल्पाने सांगितल्याप्रमाणे, जेव्हा तिने आपला हा निर्णय रोमितला सांगितला, तेव्हा त्याने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता विवाहित आणि एक मुलीचा वडील आहे रोमित...
- शिल्पासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रोमितने पुण्याच्या टीना कक्कड नावाच्या तरुणीसोबत लग्न केले.  
- रोमित आणि टीनाला एक मुलगी असून तिचे नाव रिया राज आहे. 
- शिल्पा आणि रोमित यांचे लग्न ठरले होते, त्यावेळी दोघांनीही रंजन शाही यांच्या माता पिता के चरणों में स्वर्ग या मालिकेत कॅमिओ भूमिका साकारली होती. 
- खास गोष्ट म्हणजे ही कॅमिओ भूमिका वेडिंग सीन होता. यामध्ये दोघेही वर-वधू बनले होते आणि त्यांचे फ्रेंड्स दोघांना शुभेच्छा देत होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, शिल्पा आणि टीनासोबतचे रोमितचे फोटोज...  
 
बातम्या आणखी आहेत...