मुंबई - 'सपना बाबुल का...बिदाई' आणि 'कवच : काली शक्तियों से' सारख्या शोची अॅक्ट्रेस राहिलेली सारा खान सध्या पाकिस्तानी शो 'लेकिन'मध्ये झळकत आहे. शोच्या शुटिंगशी संबंधित एक अनुभव तिने नुकताच शेयर केला आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार पाकिस्तानात शॉर्ट्स परिधान करण्याचा साराचा अनुभव एवढा विचित्र होता की, तिला लगेचच ड्रेस चेंज करावा लागाला.
नेमके काय झाले साराबरोबर..
- वृत्तानुसार शोच्या शुटिंगनंतर साराने शॉर्ट ड्रेस परिधान केला आणि हॉटेलच्या (ज्याठिकाणी ती थांबली होती) बाल्कनीत ती फिरायला लागली.
- पण त्यादरम्यान तिला आसपास उभ्या असलेल्या लोकांच्या हावभावांमध्ये काहीसा विचित्रपणा जाणवला. त्याठिकाणचे लोक तिला रोखून पाहायला लागले होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांना सांगितले की, पाकिस्तानात अशाप्रकारचे कपडे परिधान करायची परवानगी नाही. त्यानंतर सारा रूममध्ये गेली आणि कपडे चेंज केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाली सारा...