आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या शोमध्ये कधीच आला नाही आमिर खान, हे 10 सेलेब्सही कधीच दिसले नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो हा नव्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचा मंच आहे. दबंग सलमान खान, किंग खान शाहरुखपासून ते महानायक अमिताभ बच्चनपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली आहे. मात्र एक अभिनेता या मंचावर एकदाही हजर राहिला नाही, त्याचे नाव आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान.

कपिलचा पूर्वीचा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' आणि सध्याचा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय, काजोल, अनुष्का शर्मा यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली. प्रत्येकाने आपापले सिनेमे प्रमोट करण्याच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये सहभाग घेतला. मात्र आमिर खानने एकाही सिनेमाचे प्रमोशन कपिलच्या मंचावरुन केले नाही. कपिल शर्मा 2013 पासून कॉमेडी शो करत आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमिरचे तीन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये 'धूम 3' (2013), 'पीके' (2014), आणि आताचा 'दंगल' (2016) या सिनेमांचा समावेश आहे. मात्र यापैकी एकाही सिनेमाचा प्रमोशन आमिरने कपिलच्या शोमध्ये केलs नाही.
 
शोमध्ये आमिरसह आणखी कोणकोणते सेलिब्रिटी कधीच आले नाहीत? पुढील स्लाईड्सवर टाकुयात एक नजर...  
 
नोट : कपिलच्या शोमध्ये न येण्यामागे सेलिब्रिटींचे खासगी कारण असू शकते. या पॅकेजमधून आम्ही फक्त अशा सेलिब्रिटींच्या उल्लेख केला आहे, जे शोमध्ये आल्यास शो आणखी एन्टरटेनिंग ठरु शकतो.  
बातम्या आणखी आहेत...