बिग बॉसचे सातवे पर्व आता आपल्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी या शोचा ग्रॅण्ड फिनाले रंगणार आहे. मागील सर्व पर्वाप्रमाणेच बिग बॉसचे हे पर्वही बरेच वादात राहिले. भांडणं, वाद-विवाद, शिवीगाळपासून ते थेट मारहाणीपर्यंत सर्व काही या पर्वात प्रेक्षकांना बघायला मिळालं.
अँडी आणि कुशालच यांच्याती वादाने बरेच लाइमलाइट मिळवले. या दोघांमधील वाद एवढा विकोपाला पोहोचला की कुशालने अँडीवर चक्क हात उचलला. त्यामुळे कुशालला शोबाहेर काढण्यात आले. मात्र काही तासांनी प्रकरण शांत झाल्याने कुशालची शोमध्ये रिएन्ट्री झाला.
बिग बॉसच्या घरात ही केवळ एकच मारहाणीची घटना घडली नाही. तर अरमान कोहलीनेसुद्धा सोफिया हयातला मारहाण केली. त्यामुळे त्याला एक दिवस तुरुंगात काढावा लागला. शोबाहेर पडल्यानंतर सोफियाने अरमानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अरमानला अटक केली. मात्र आता जामीनावर तो बाहेर आहे.
या भांडणासोबतच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये रंगलेला रोमान्सही चर्चेचा विषय ठरला. एकीकडे कुशाल आणि गोहर यांच्यात प्रेमांकुर फुलले तर दुसरीकडे अरमान आणि तनिषासुद्धा उघडपणे प्रेम करताना दिसले. अनेकदा हे दोन कपल कॅमे-यासमोर इंटीमेट होताना दिसले.
आता येत्या 29 डिसेंबर रोजी शोचा ग्रॅण्ड फिनाले रंगणार आहे. या शोच्या अंतिम फेरीत तनिषा मुखर्जी, अँडी, संग्राम सिंग, गोहर खान आणि एजाज खान पोहोचले आहेत. या पाच जणांमधून बिग बॉसच्या विजेत्याची निवड होती.
पुढील स्लाईड्समध्ये क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये बघा या स्पर्धकांचा प्रवास...