आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Win Bigg Boss7: Tanisha,Sangram,Andy,Gauhar Or Ejaz

POLL: कोण जिकेलं Bigg Boss 7: तनिषा, गोहर, एजाज़ की संग्राम?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7' आता शेवटच्या टप्प्यात आहे. 29 डिसेंबर 2013ला या रियालिटी शोचा ग्रँड फिनाले आहे. नेहमीसारखाच यावेळीसुध्दा हे पर्व वादाच्या भोव-यात होतं. वाद-भांडण, शिव्या, शाब्दिक बाचाबाची पर्यंतच थांबलं नाही तर थेट मारहाणपर्यंत गेलं. अँडी आणि कुशालचा वाद तुम्हाला लक्षात असेलचं. दोघांचं भांडणं इतक वाढलं होतं, की कुशालने अँडवर हात उचलला होता. यामुळे कुशालला शोच्या बाहेर जावं लागलं होतं. परंतु सर्व प्रकरण शांत झाल्यावर कुशाल शोमध्ये पुन्हा आला पण त्यानंतरही प्रकरण थांबलं नव्हतं. शोची स्पर्धक सोफिया हयातने एविक्शनंतर बिग बॉसच्या घरात एका टास्कच्या दरम्यान अरमान कोहलीने तिच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा आरोप लावला होता. सोफियाने अरमान विरुध्द तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अरमानला अटक केली आणि जामीनावर त्याची सुटकाही केली. फक्त वादविवादचं नव्हे तर हा पर्व रोमान्स आणि प्रेमाप्रकरणांमुळे सुध्दा चर्चेत होता. एका बाजूला कुशाल-गोहरच्या प्रेमाचा ठसका उठला तर दुस-या बाजूला अरमान-तनिषाच्या प्रेमाचे दृश्य कॅमे-यात कैद झाले. आता 28 डिसेंबरला या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. फिनालेमध्ये तनिषा मुखर्जी, संग्राम सिंह, गोहर खान, एजाज खान आहोत. आता यांच्यामधूनच बिग बॉसचा एक विजेता होणार आहे. तुम्हाला मते या चार स्पर्धकांमधून कोण बिग बॉसचा विजेता ठरु शकतो आणि कोण जिंकेलं 50 लाखांचा धनादेश? खालील कमेन्ट्स बॉक्समध्ये तुमचं मतं लिहू शकता.
पुढील स्लाइड्सवर बघा या स्पर्धकांचा सफर छायाचित्रांच्या माध्यमातून...