आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर TV वर का वारंवार प्रसारित केला जातो 'सूर्यवंशम'... काय आहे यामागचे खरे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक ई. वी. वी. सत्यनारायण दिग्दर्शित सूर्यवंशम या सिनेमाच्या रिलीजला आज (22 मे) 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील हीरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत हे नावे प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहेत. सिनेमातील अनेक सीन्स आणि डायलॉग्स प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात. याचे कारण म्हणजे चॅनल ट्यून होताच एक सिनेमा आहे जो वारंवार आपल्याला दिसत असतो. तो सिनेमा म्हणजे 'सूर्यवंशम'. या सिनेमाने टीव्हीवर अनेकदा टेलिकास्ट होण्याचा अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. 

सेटमॅक्स वाहिनीवर का वारंवार प्रसारित केला जातो हा सिनेमा.. 
- बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर खूप कमाई केली नसली तरीही 'सेट मॅक्स' (आताचे सोनी मॅक्स) या टीव्ही चॅनेलवर सिनेमाचा अक्षरश: रतीब घालण्यात येतो. 
- 1999 साली रिलीज झालेला हा सिनेमा सोनी मॅक्सवर आठवड्यातून कमीत कमी मान एकदा तरी दाखवलाच जातो. इतर अनेक सिनेमे असतानाही केवळ हाच चित्रपट पुन्हा पुन्हा का दाखवला जातो? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. 
- सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी अलीकडेच हा सस्पेन्स उघड केला. वैशाली शर्मा यांच्या सांगण्यानुसार, "सोनी मॅक्सने या सिनेमाचे हक्क 100 वर्षांसाठी विकत घेतले आहेत. त्यामुळेच हा सिनेमा परत परत दाखवला जातो."

एकाच वर्षी आले सिनेमा आणि चॅनल...
- दुसरं महत्वाचं कारण म्हणजे, हा सिनेमा ज्यावर्षी प्रदर्शित झाला, त्याच वर्षी म्हणजेच, 1999 साली सेट मॅक्स चॅनेलही सुरू झाले होते, त्यामुळे चॅनेलचे या सिनेमाशी एक अनोखे नातेच आहे. 
- सोशल मीडियावर या सिनेमासंदर्भात अनेकदा मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत असला तरीही त्या सिनेमाचे चाहतेही अनेक आहेत. त्यामुळेच अजून अनेक दशकं या सिनेमाला (चॅनेलवर तरी) मरण नाही आणि चाहत्यांना त्यांच्या लाडक्या बिग बींना हिरा ठाकूर आणि भानुप्रताप यांच्या दुहेरी भूमिकेत बघता येणार आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, सिनेमाशी निगडीत खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...