आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Small Screens Popular Bahus Turned Into Vamps

सोज्वळ सुनांच्या रुपात फेमस झाल्या या 11 TV अॅक्ट्रेसेस, आता बनल्या खलनायिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सना खान आणि श्वेता तिवारी - Divya Marathi
फाइल फोटोः सना खान आणि श्वेता तिवारी

मुंबईः जवळजवळ दहा वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेत्री सना खानने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती, तेव्हा ती अगदी साध्या आणि सोज्वळ रुपात अवतरली होती. तिने साकारलेली साधना ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. त्यावेळी ही सोज्वळ दिसणारी सून कालांतराने खलनायिका बनून पडद्यावर दिसेल, याचा विचारही कुणी केला नसेल. मात्र झाले असेच. 'बिदाई' या मालिकेद्वारे करिअरची सुरुवात करणारी सारा अलीकडेच 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेत खलनायिकेच्या रुपात झळकली होती.
सोज्वळ सून ते खलनायिका असा प्रवास करणारी सना एकमेव टीव्ही अॅक्ट्रेस नाहीये. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या सोज्वळ भूमिकांमधून प्रसिद्ध झाल्या. मात्र आता त्यांनी खलनायिका होणे पसंत केले आहे.
काही दिवसांपूर्वीच divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली होती, ''एक अॅक्टर म्हणून तुम्हाला स्वतःला चॅलेंज देणे महत्त्वाचे आहे. भूतकाळात मी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या, त्या प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत. मात्र आता मी ज्या भूमिका साकारत आहे, त्या अगदी विरुद्ध आहेत. 'बेगुसराय' या मालिकेतून बिंदियाच्या भूमिकेत फॅन्सला अगदी वेगळी श्वेता दिसत आहे.''
आजवर श्वेताला पॉझिटिव्ह रोल्ससाठी ओळखले जात होते. प्रेरणा ही तिची गाजलेली व्यक्तिरेखा आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत तिने ही व्यक्तिरेखा साकारली होती. सारा आणि श्वेतासह अनेक अभिनेत्रींनी आता खलनायिका बनने पसंत केले आहे.
कोण आहेत, या अभिनेत्री जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...