आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Medical Check Before The Entering Bigg Boss

Bigg Boss-8: घरात एन्ट्री होण्यापूर्वी स्पर्धकांची होणार प्रेग्नेंसी आणि HIV टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बिग बॉस'चे नवे पर्व रविवारपासून (21 सप्टेंबर) छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. मात्र यंदाच्या पर्वात 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांची एन्ट्री सहजासहजी होणार नाहीये. ('बिग बॉस-8'चे स्पर्धक 'Mr.Gay' आणि 'Xpose' girl, पाहा Final List) शोच्या नवीन फॉर्मेटनुसार, सर्व स्पर्धकांचे मेडिकल चेकअप होईल आणि त्यानंतरच त्यांना घरात प्रवेश दिला जाईल. यावेळी स्पर्धकांची मलेरिया, डेंग्यू, हेपेटायटिस बी, प्रेग्नेंसी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, मधुमेह आणि हृदय रोग यांसारख्या आजारांची चाचणी केली जाणार आहे. ('Bigg Boss 8'चा प्रत्येक एपिसोड एकत्र बसून बघणार अरमान, तनिषा, अँडी आणि एली)
जर एखाद्या स्पर्धकांना यापैकी कुठलाही आजार आढळल्यास, त्याला घरात एन्ट्री दिली जाणार नाही. शिवाय स्पर्धकांच्या लगेचमध्ये असलेल्या साहित्याचीही पडताळणी करुन त्या वस्तू सोबत ठेवण्यामागची कारणे त्यांना विचारली जाणार आहेत. विशेषतः त्यांच्या औषधांची तपासणी केली जाणार आहे. (Bigg Boss-8 : रिहर्सल करताना दिसला सलमान, पाहा छायाचित्रे)
नियमांनुसार, औषधांसोबत डॉक्टरांची चिठ्ठी असणे गरजचे आहे. जर स्पर्धकांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसेल, तर त्यांना ती औषधे घरात नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मेडिकल चेकअपची आवश्यकता का?
मागील एका पर्वात एक स्पर्धक प्रेग्नेंच असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे तिला अर्धवट हा शो सोडावा लागला होता. याचा परिणाम शोच्या शेड्युलवर झाला होता. याच कारणामुळे यावेळी मेडिकल चेकअप करणे गरजेचे समजले गेले आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, जेव्हा प्रेग्नेंसीमुळे साक्षी प्रधानला सोडावा लागला होता शो...