आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिकाच्या ‘बॅचलरेट इंडिया’मध्ये सनी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मल्लिका शेरावतच्या ‘बॅचलरेट इंडिया- मेरे ख्यालोंकी मल्लिका’ टीव्ही शोमध्ये सहभागी होण्यासाठी सनी देओलशी संपर्क करण्यात आला आहे. लाइफ ओके चॅनलचे जनरल मॅनेजर अजित ठाकूर यांच्या हवाल्याने म्हटले जात आहे की, यात सनी देओलशिवाय दुसरा सेलेब्रिटी नसेल, पण यापूर्वी सनी लिओन यात सहभागी होईल, असे सूत्रांनी सांगितले होते.

शोच्या प्रसिद्धीसाठी अफवा पसरवल्या जात असल्याचीदेखील शक्यता आहे. कारण सनी सध्या उदयपूरमध्ये 'भय्याजी सुपरहिट' या आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटामध्ये प्रीती झिंटा देखील आहे. मल्लिका देखील उदयपूरमध्ये शोचे चित्रीकरण करत आहे. याच कारणास्तव अशी चर्चा होत आहे की सनी देओल मल्लिकाच्या शोमध्ये सहभागी होत आहे.