आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मशहूर गुलाटी'पासून ते कृष्णापर्यंत, बघा फेमस कॉमेडिअन्सच्या वाईफचे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आरतीसोबत सुनील ग्रोवर. उजवीकडे - पत्नी कश्मीरासोबत कृष्णा अभिषेक - Divya Marathi
पत्नी आरतीसोबत सुनील ग्रोवर. उजवीकडे - पत्नी कश्मीरासोबत कृष्णा अभिषेक

मुंबईः टीव्हीवर काम करणारे स्टँडअप कॉमेडिअन प्रेक्षकांना हसवण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाही. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी त्यांच्या फॅन्सना बरंच काही ठाऊक असतं. पण त्यांचे खासगी आयुष्य क्वचितच समोर येतं. उदारहणार्थ गुत्थीच्या नावाने प्रसिद्ध असलेला आणि 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करणारा विनोदवीर सुनील ग्रोवर विवाहित आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या पत्नीचे नाव आरती असल्याचे सांगितले. सुनीलची पत्नी आरती ही व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. सुनील आणि आरती या दाम्पत्याला एक मुलगासुद्धा आहे. 

हे विनोदवीरसुद्धा आहेत विवाहित...
सुनील ग्रोवरशिवाय राजू श्रीवास्तव, चंदन प्रभाकर, राजीव ठाकुर, अहसान कुरैशी, अली असगर, कीकू शारदा, सुनील पॉल आणि कृष्णा अभिषेक हे विनोदवीरसुद्धा खासगी आयुष्यात विवाहित आहेत. यापैकी अनेकांच्या पत्नी या लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात.  
 
सुनील ग्रोवर
सुनील ग्रोवर कपिल शर्माच्या शोमधील 'गुत्थी' या पात्रामुळे प्रसिद्ध झाला. आता तो द कपिल शर्मा शोमध्ये डॉक्टर मशहूर गुलाटीची भूमिका साकारताना दिसतोय.  

कृष्णा अभिषेक 
अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक हा प्रसिद्ध विनोदवीरांपैकी एक आहे. अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये तो झळकला आहे. याशिवाय 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या शोमध्ये झळकला आहे.  नच बलिए सीजन-3, कॉमेडी सर्कस आणि गँग्स ऑफ हसेपूर या शोमध्येही त्याने काम केले आहे.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पॉप्युलर कॉमेडियन्सच्या पत्नींचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...