आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'पार्वती' आणि 'सती'ने अशी साजरी केली पार्टी, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॅप अप पार्टीत सोनारिका भदौरिया आणि मोनी रॉय)
मुंबईः लाइफ ओके वाहिनीवर प्रसारित होणा-या 'देवों के देव महादेव' या पौराणिक मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या निर्मात्यांनी स्टारकास्टसाठी एक रॅपअप पार्टी आयोजित केली होती. मुंबईतील जुहूस्थित व्हिला 69मध्ये आयोजित या पार्टीत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया आणि सतीची भूमिका वठवणारी मोनी रॉय धमाल करताना दिसल्या.
यावेळी त्यांनी कॅमे-यासमोर पाउट पोज दिल्या. मालिकेत नंदीची भूमिका साकारणारे अभिनेते कुमार हेगडेसुद्धा पार्टीत एन्जॉय करताना दिसले.
'देवों के देव महादेव' ही मालिका 18 डिसेंबर 2011 रोजी लाइफ ओके वाहिनीवर दाखल झाली होती. ही या वाहिनीची सर्वाधिक काळ चालणारी मालिका ठरली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'देवों के देव महादेव' या मालिकेच्या रॅपअप पार्टीत क्लिक झालेली स्टार्सची खास छायाचित्रे...