आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये हैं मोहबत्तें'ने पूर्ण केले 200 एपिसोड, टीमने केक कापून केले सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, महिका वर्मा आणि श्रुति बापना)
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणा-या 'ये हैं मोहबत्तें' या मालिकेने 200 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. मालिकेला मिळालेले हे यश सर्व कलाकारांनी केक कापून साजरे केले. 4 ऑगस्ट रोजी मालिकेचा 200वा भाग प्रसारित करण्यात आला.
या पार्टीत मालिकेत लीड रोल साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हजर होती. तिच्यासह करन पटेलसुद्धा दिसला. याशिवाय अभिनेत्री महिका वर्मा, श्रुती बापना आणि मालिकेतील इतर क्रू मेंबर्ससुद्धा सेलिब्रेशन मूडमध्ये दिसले. यावेळी एक नव्हे तर तीन केक कापण्यात आले. त्यापैकी एका केकवर 'complete 200 episodes ye hai mohabbatein' असे लिहिण्यात आले होते.
या मालिकेची निर्माती एकता कपूर आहे. 3 डिसेंबर 2013 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या मालिकेला आत्तापर्यंत गर्व इंडियन टीव्ही अवॉर्ड, सातवा बोरोप्लस गोल्ड अवॉर्ड 2014 आणि बारावा स्टार परिवार अवॉर्ड 2014 मिळाला आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'ये हैं मोहब्बतें'चे 200 एपिसोड पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनची झलक...