आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये बॅन होऊ शकतो हा हिंदुस्तानी शो, जाणून घ्या कारण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ये है मोहब्बते' या मालिकेतील इंटीमेंट सीन, खाली, ज्या एपिसोडमुळे पाकिस्तानमध्ये बॅन होऊ शकते मालिका तो सीन. - Divya Marathi
'ये है मोहब्बते' या मालिकेतील इंटीमेंट सीन, खाली, ज्या एपिसोडमुळे पाकिस्तानमध्ये बॅन होऊ शकते मालिका तो सीन.
मुंबई: स्‍टार प्‍लसची 'ये है मोहब्बते' मालिका पाकिस्तानमध्ये वल्गर कंटेंट (अभद्र सीन) दाखवल्याने बॅन होऊ शकते. सूत्रांच्या सांगण्यानुसार, मालिकेत 1 जूनला दाखवल्या गेलेल्या कॅरेक्टर्सना इंटीमेट होताना दाखवण्यात आले. हा एपिसोड पाकिस्तानमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया ऑर्डिनेन्स-2015 अंतर्गत व्हायलेशनच्या श्रेणीत येतो.
मीडिया रेग्युलेटरी बॉडी PEMRAने उर्दू चॅनलला पाठवली नोटिस...
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA)टीव्ही कंटेंटचे निरक्षण करतात. त्यांनी पाकिस्तानमध्ये दाखवल्या जाणा-या कंटेंटवर काही नार्म्स बनवले आहेत. अलीकडेच PEMRAने पाकिस्तानमध्ये दाखवल्या जाणा-या 'ये है मोहब्बते' मालिकेचे प्रसारण करणा-या एका उर्दू चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संस्थेने टीव्ही चॅनल शो-कॉज नोटीस पाठवून त्याचे उत्तर मागितले आहे. त्यामध्ये चॅनलव्दारे मालिकेत कपलला 'इनडिसेंट अॅक्टिव्हिटीज' करताना दाखवले आहे. PEMRAने चॅनलला उत्तर देण्यासाठी 8 जूनपर्यंतची मुदत मागितली आहे. जर या तारखेपर्यंत उत्तर मिळाले नाही तर पुढील कारवाई होईल.
करण म्हणाला, 'काहीच कल्पना नाही'...
मालिकेत रमन भल्लाची भूमिका साकारणा-या करण पटेलने या प्रकणारवर सांगितले, 'होय, मलाही याबाबत काही फोन आलेत. परंतु प्रमाणिकपणे सांगायचे झाले तर मला या प्रकरणाविषयी काहीच कल्पना नाहीये. परंतु जर असे झाले तर खरंच ही वाईट बातमी आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'ये है मोहब्बते' मालिकेतील काही सीन...
बातम्या आणखी आहेत...