आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 'ये रिश्ता...'चा बालकलाकार 'नक्ष'ला, अभिनेता नव्हे व्हायचे आहे इंजिनिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आईवडील आणि बहीण नविकासोबत शिवांश कोटिया)
मुंबईः 'ये रिश्ता क्या कहलाता' या प्रसिद्ध मालिकेतील नक्षचे पात्र साकारणारा बालकलाकार शिवांश कोटियाने आपल्या क्यूट स्माइलने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहे. शिवाय आपल्या अभिनयासाठी त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शिवांशची भविष्यात अभिनेता नव्हे तर मॅकेनिकल इंजिनिअर व्हायची इच्छा आहे.
अलीकडेच Divyamarathi.com शी बातचित करताना शिवांश कोटियाने सांगितले, "अभिनय क्षेत्र हे स्टेबल नाहीये. या क्षेत्रात तुम्ही कधी बेरोजगार व्हाल, हे सांगत येत नाही. मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर व्हायची माझी इच्छा आहे."
8 वर्षीय शिवांश पुढे म्हणाला, "ब-याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील मी महत्त्वाचा भाग होतो. मात्र जसा हा शो वेगाने पुढे जाऊ लागला, त्यावेळी मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. कॅमे-यासमोर राहणे मला पसंत आहे. मात्र कधीकधी काम हे हेक्टिक होऊन जातो. मात्र अभिनयासोबत अभ्याससुद्धा मी मॅनेज केला. डेली सोप नव्हे तर जाहिरातीत काम करणे मला जास्त पसंत आहे, कारण जाहिरातींच्या शूटिंगला फार कमी वेळ लागतो. तुम्हाला बरेच काही शिकायला मिळतं आणि मोठमोठे कलाकार तुमच्या आजुबाजुला असतात. मी त्या कलाकारांकडून बरेच काही शिकलोय."
काही महिन्यांपूर्वी शिवांशच्या आईला हिप इन्ज्युरी झाली होती. तेव्हा या लिटिल चॅम्पने आपल्या आईची शक्य तेवढी मदत केली. याविषयी शिवांशच्या आईने सांगितले, "मी खूप भाग्यशाली आहे, की मला शिवांशसारखा मुलगा आहे. जेव्हा माझा अपघात झाला होता, तेव्हा शिवांश एकटा प्रवास करुन शूटिंग स्थळी पोहोचायचा. त्याकाळात 12 तासांची शिफ्ट असायची. तो मला मुळीच त्रास देत नव्हता. त्याने स्वतःला चांगल्या पद्धतीने सांभाळले. त्यामुळे माझा मुलगा खूप समजूतदार झाला, असे मला वाटतंय. तो तुम्हाला खूप शांत वाटत असेल, मात्र सत्य हे आहे, की तो खूप मस्तीखोर आहे."
शिवांशला आपल्या वडिलांसोबत कार टॉइज खेळणे पसंत आहे. शिवाय तो आपल्या आईला घरकामातदेखील मदत करतो. शिवांशला एक थोरली बहीण असून नविका कोटिया हे तिचे नाव आहे. ही बहीणभावाची जोडी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेसोबतच श्रीदेवी स्टारर 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये एकत्र झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शिवांश कोटियाची खास छायाचित्रे...