टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची वर्षा म्हणजेच पूजा जोशी प्रेग्नेंट आहे. नुकतेच पूजाने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये पूजाने पिंक रंगाचा टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट घातला आहे. एका फोटोमध्ये ती बेबी शूजला पाहताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे '❤️'. पूजाची बहीण दामिनीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहीले आहे की, 'Can’t wait ???? #family #love #happiness #touchwood #motherhood #sister:'. हे पूजाचे पहिलेच बाळ असणार आहे. एका फ्रेंडच्या पार्टीमध्ये झाली होती दोघांची भेट..
पूजा आणि मनीष दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी 2015 साली लग्न केले. मनीष हा बिझनेसमन आहे. पूजाने 'धरती की वीर योद्धा: पृथ्वीराज चौहान'मधून टीव्हीवर डेब्यू केला होता. पूजाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही काम केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजाच्या फोटोशूटचे 4 फोटोज्..