मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'दया भाभी' उर्फ अभिनेत्री दिशा वाकाणीनंतर आता 'ये रिश्ता क्या कहलता है'मधील 'वर्षा' उर्फ पूजा जोशी विवाहबंधनात अडकली. अकोलाचे बिझनेसमन मनीषसोबत पूजा जोशीचे लग्न झाले. मुंबईत त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला.
आपल्या लग्नाविषयी पूजा म्हणाली, ''फायनली, माझे लग्न झाले.आपले लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावे, असे माझे स्वप्न होते. सर्वकाही ठरवल्याप्रमाणे झाल्याने मी खूप आनंदी आहे. हनीमूनसाठी आम्ही केरळला जाणार आहोत.''
पूजाच्या लग्नात रोहन मेहरा, अंशुल कौर, लता सभरवाल, संजीव सेठसह टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. सर्वांनीच नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पूजाची बेस्ट फ्रेंड मुग्धा चाफेकर लग्नात आवर्जुन हजर होती.
लग्नाच्या एका दिवसापूर्वी पूजाच्या कुटुंबीयांनी संगीत सेरेमनीचे आयोजन केले होते. यावेळी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील लीड अॅक्ट्रेस हिना खानसह बरेच सेलेब्स उपस्थित होते. पूजाच्या लग्नात हिना सहभागी होऊ शकली नाही. याचे कारण तिचे हेक्टिक शेड्युल सांगितले जात आहे. शोचा लीड अॅक्टर करण मेहरासुद्धा लग्नात दिसला नाही. कारण तो याकाळात हॉलिडेवर आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पूजा जोशीच्या लग्न आणि संगीत सेरेमनीचे फोटोज...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर