आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरु झाला हनी सिंगचा रिअॅलिटी शो, पाहा शूटिंगचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शोच्या शूटिंगवेळी हनी सिंग)
मुंबई - पंजाबी रॅप सिंगर यो यो हनी सिंगचा इंडियाज रॉ स्टार हा शो छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. प्रेक्षकांनी यूट्युबवर रिलीज करण्यात आलेल्या शोच्या प्रोमो आणि टीजरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या शोसाठी हनी सिंगने बरीच मेहनत घेतली आहे. मुंबईस्थित फिल्म सिटीत शोच्या प्रोमोचे शूटिंग झाले होते. येथे मंदिरातील प्रोमो शूट करण्यात आला होता. याशिवाय वेगवेगळ्या लोकेशन्सवरसुद्धा शोच्या प्रोमोची शूटिंग झाली.
गेल्या मंगळवारी इंडियाज रॉ स्टारचा पहिला एपिसोड शूट करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री गौहर खानची विशेष उपस्थिती होती. ती या शोची होस्ट आहे. दर रविवारी संध्याकाळी सात वाजता हा शो स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंगदरम्यानची निवडक छायाचित्रे...