आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj And Harbhajan Singh On The Set Of Comedy Nights With Kapil

'कॉमेडी नाइट्स..'च्या सेटवर युवराज-भज्जीने लावले चौकार-षट्कार, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय शोमध्ये बॉलिवूडसोबतच क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींचे स्वागत केले जाते. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्यासह वीरेंद्र सहवाग, कपिल देव, सुनील गावस्कर हे क्रिकेट जगतातील नामवंत व्यक्ती कपिलच्या शोमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर आता युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांनीही कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली.
मात्र यंदाचा युवराज आणि हरभजन स्पेशल हा शो नेहमीपेक्षा काहीसा वेगळा असणार आहे. कारण या एपिसोडचे शुटिंग आउटडोअर करण्यात आले. यावेळी हे दोन्ही क्रिकेटपटू मैदानात क्रिकेट खेळताना दिसले. इतकेच नाही तर या दोघांकडून कपिलनेसुद्धा क्रिकेटचे धडे गिरवले.
या शोमध्ये युवराज सिंहची आई शबनम सिंह यादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी युवराजच्या लग्नाचा विषय निघाला असता, आईने निवडलेल्या मुलीशीच लग्न करणार असल्याचे युवराजने सांगितले.
तर दुसरीकडे भज्जीने 'दमादम मस्त कलंदर' हे गाणे गाऊन प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. कपिलची बुआ (उपासना सिंह) यावेळी युवराज आणि भज्जीसह फ्लर्टिंग करताना दिसली.
हा एपिसोड 'हॉलिडे' आणि 'हमशक्ल' स्पेशल एपिसोड प्रसारित झाल्यानंतर प्रसारित केला जाणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर युवराज आणि भज्जीने कसे लावले चौकर-षट्कार...