आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A List Leading Actresses Dying To Be Paired Opposite Hrithik Roshan In Mohenjodaro?

'मोहनजोदडो'मध्ये कोण होणार हृतिकची हिरोइन, तयार झाली मोठी यादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनला घेऊन 'खेले हम जी जान से' सिनेमा बनवणारा दिग्दर्शक अशुतोष गोवरिकर एका टीव्ही प्रोजेक्ट व्यतिरिक्त सध्या आपल्या नवीन सिनेमावर काम करत आहे. त्या सिनेमाचे नाव 'मोहनजोदडो' असून त्याची कहाणी एका सिंधू घाटीच्या सभ्यतावर आधारित आहे.
आशुतोषच्या या सिनेमाचा हीरो हृतिक रोशन असणार आहे. परंतु त्याची को-स्टार कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. सुत्रांच्या सांगण्यानुसार, या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्रींची एक मोठी यादी तयार झाली आहे. गोवरिकरचे म्हणणे आहे, की त्याने त्यांच्या सिनेमासाठी काही अभिनेत्रींचा विचार केला आहे. परंतु अद्याप कोणत्याही अभिनेत्रीची निवड केलेली नाही.
हृतिकविषयी सांगायचे झाले तर, तो मानतो, की आशुतोषची निवड चांगली आहे. 'मोहनजोदडो'पूर्वी त्याने 2008मध्ये हृतिकला घेऊन 'जोधा अकबर' सिनेमा बनवला होता. त्यावेळी त्याने हृतिकची को-स्टार ऐश्वर्या रायला कास्ट केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. सिनेमाने बेस्ट फिल्मफेअर अवॉर्ड जिंकून बेस्ट दिग्दर्शकचा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावी केला होता.
आशुतोष सध्या सिंधू घाटीच्या सभ्यतांवर संशोधन करून सिनेमाच्या पटकथा लिहीत आहे. सिनेमात ए. आर. रहमान यांचे संगीत असणार आहे.
'मोहनजोदडो'ची शुटिंग सुरू होण्यास काही दिवस लागणार आहे. त्यावेळेत हृतिक रोशन आपल्या 'बँग बँग'ची शुटिंग पूर्ण करणार आहे. या सिनेमात हृतिक अभिनेत्री कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या दोन अभिनेत्रींनी 'मोहनजोदडो'मध्ये काम करण्यास दिला नकार...