आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Special Screening Marathi Movie Lai Bhaari For Sachin Tendulkar

सचिनने पत्नी आणि मुलीसह लुटली रितेशच्या 'लय भारी'ची मजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचा पहिला मराठी सिनेमा असलेला 'लय भारी' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. रिलीजच्या तीन आठवड्यांनंतरसुद्धा या सिनेमाची क्रेझ कायम आहे. हा सिनेमा बघण्याचा मोह क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकरलासुद्धा आवरता आला नाही.
खास सचिन आणि त्याच्या कुटुंबासाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग अलीकडेच मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सचिन पत्नी अंजली आणि मुलगी सारासह पोहोचला होता. रितेश देशमुख सध्या आपल्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने भारताबाहेर असल्यामुळे तो या स्क्रिनिंगला उपस्थित राहू शकला नाही. मात्र सचिनचे स्वागत करण्यासाठी या सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर आवर्जुन हजर होता.
रितेश देशमुख, शरद केळकर, राधिका आपटे, तन्वी आझमी यांची प्रमुख भूमिका असलेला लय भारी हा सिनेमा यावर्षी 11 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने तिकिटबारीवर 31.52 कोटींचा गल्ला जमवला आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित या सिनेमात जेनेलिया देशमुख आणि सलमान खान यांनी स्पेशल अपिअरन्स दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'लय भारी'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सचिनची पत्नी आणि
मुलीसोबतची खास छायाचित्रे...