आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: हे आहेत 1982चे \'शौकीन\', पाहा सिनेमामधील काही आठणीतील छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('शौकीन'च्या एका सीनमध्ये ए.के. हंगल, उप्पल दत्त आणि अशोक कुमार)
मुंबई: अक्षय कुमारचा 'द शौकीन्स' रुपेरी पडद्यावर झळकला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हळूवार सुरुवार केली. परंतु शुक्रवारी (7 नोव्हेंबर) (ओपनिंग डे) 5 कोटींचा व्यवसाय करून यशस्वी ठरला. हा सिनेमा 'शौकीन' (1982)चा रिमेक आहे. मात्र, या सिनेमाची 'शौकीन'पेक्षा कहाणी खूप वेगळी आहे. या सिनेमात अनुपम खेर, पियूष मिश्रा आणि अन्नू कपूर यांनी 'द शौकीन्स'मध्ये वयोवृध्दांची भूमिका साकारली आहे.
'शौकीन'मध्ये हेच पात्र अशोक कुमार, उप्पल दत्त, ए. के. हंगल यांनी साकारले होते. या दोन्ही सिनेमांत एकच साम्य आहे. तिन्ही वयोवृध्द व्यक्ती एका तरुणीच्या मागे पडतात. 'द शौकीन्स'मध्ये या तरुणीचे पात्र लीसा हेडनने साकारले असून 1982च्या 'शौकीन'मध्ये रति अग्निहोत्रीने साकारले होते. सिनेमाची कहानी तीन वयोवृध्द एका तरुणीवर प्रेम करतात. ते तिला पटवण्यासाठी नव-नवीन फंडे आमलात आणतात. यामधील कॉमेडी पोट धरून हसायला लावते.
'द शौकीन्स'मध्ये अनुपम खेर, पियूष मिश्रा आणि अन्नू कपूर यांनी 'शौकीन' बनून लोकांचे मनोरंजन केले. परंतु खरे 'शौकीन' अशोक कुमार, उप्पल दत्त आणि ए. के. हंगल होते.
अशोक कुमार, उप्पल दत्त आणि ए.के हंगल यांच्या आठवणीतील भूमिका-
'शौकीन'ची कहाणी अशोक कुमार, उप्पल दत्त आणि ए.के. हंगल यांच्यावर फोकल करणारी होती. तिघांनी आपल्या अभिनयाने सिनेमाला आठवणीत ठेवले. सिनेमाच्या कहाणीला जशी डिमांड होती, तसेच तिघांनी काम केले. मुंबईमध्ये एक सीनमध्ये उप्पल दत्त आणि ए.के. हंगल विना कपड्यांमध्ये दिसले होते तर अशोक कुमार कुर्ता परिधान करून दिसले होते. या सिनेमाला आता 32 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या तिन्ही अभिनेत्यांचे अभिनय आजही आठवणीत आहेत.
शौकीनची माहिती-
दिग्दर्शक: बासु चटर्जी
म्युजिक: आर. डी. बर्मन
रिलीज: 1982
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 1982च्या 'शौकीन'ची काही आठवणीतील छायाचित्रे...