आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Aagadu' Breaks Salman Khan's 'Kick' Record In US

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेश बाबूच्या 'अगाडू'ने मोडला 'किक'चा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महेश बाबू आणि सलमान खान)

तेलुगू सुपरस्टार महेश बाबूच्या 'अगाडू' या चित्रपटाची निर्मितीपासूनच चर्चा होती. यात जबरदस्त अॅक्शन आणि दृश्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे. अमेरिकामध्ये १६० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 'अगाडू'ला केवळ आपल्या प्रीमियर शोद्वारे जवळपास ३.५० कोटी रुपयांची कमाई करण्यात यश प्राप्त झाले आहे. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा एक नवा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या 'किक'च्या नावे होता.
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या नम्रता शिरोडकरचा पती महेश बाबूच 'पोक्किरी' या तेलुगू चित्रपटाचा नायक होता. त्याच्या 'वॉन्टेड'च्या रिमेकमुळेच सलमान खानच्या करिअरला जीवदान मिळाले. आता 'अगाडू' या नव्या चित्रपटाचे बजेट ७५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही दक्षिणेकडील अथवा हिंदी चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाचे बजेट मोठे आहे. या चित्रपटामध्ये तमन्ना भाटिया नायिका आहे.