आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या रिलीजपूर्वी लाँच झाला \'पीके\'चा गेम, आकर्षक लूकमध्ये दिसली अनुष्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा आणि विधू विनोद चोप्रासोबत आमिर खान)
मुंबईः अभिनेता आमिर खान सध्या आपल्या आगामी 'पीके' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनचा एक भाग म्हणून शुक्रवारी या सिनेमाचा गेम लाँच करण्यात आला. यावेळी अनुष्का शर्मा, राजकुमार हिराणी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.
इव्हेंटमध्ये अनुष्का शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तर आमिर पिंक शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये होता. आमिरने यावेळी भोजपूरी अंदाजात आपल्या सिनेमाचे प्रमोशन केले.
'पीके' हा सिनेमा येत्या 19 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आमिर आणि अनुष्कासोबतच संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पीकेच्या गेम लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...