आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: \'लगान\'च्या सेटवर झाली होती किरण-आमिरची मैत्री, 5 वर्षांनी अडकले लग्नगाठीत, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान आणि किरण राव)
मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिचा आज वाढदिवस आहे. किरणने आज वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. 'धोबीघाट' या सिनेमाची दिग्दर्शिका असलेली किरण राव आर्ट सिनेमांसाठी ओळखली जाते. आमिर खानसोबत 2005 मध्ये किरण लग्नगाठीत अडकली.
बंगळूरुमध्ये जन्मलेली किरण कोलकातामध्ये लहानाची मोठी झाली. आमिर आणि किरणची पहिली भेट 2001 मध्ये 'लगान' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाची ती सहायक दिग्दर्शिका होती. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना ती असिस्ट करत होती. या सिनेमाच्या सेटवर आमिर आणि किरणची सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि लग्नात झाले. लग्नानंतर किरणने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'धोबीघाट' हा सिनेमा तिने दिग्दर्शित केला. याशिवाय 'सत्यमेव जयते' हा टीव्ही शो आणि 'शिप ऑफ थीसिअस' या पुरस्कार विजेत्या सिनेमाची ती निर्मातीसुद्धा आहे.
किरण आणि आमिर यांना एक मुलगा असून त्याचे नाव आझाद राव खान आहे. किरण आमिर खानची दुसरी पत्नी आहे. आमिरचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते. 2002 मध्ये आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नापासून आमिरला एक मुलगा आणि एक मुलगी असून जुनैद आणि इरा ही त्यांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आमिर आणि किरणची निवडक छायाचित्रे...