(फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना अभिनेता आमिर खान)
काही दिवसांपूर्वी आमिर खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतर मोदी आमिरच्या 'सत्यमेव जयते'मध्ये प्रमुख पाहुणे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान आमिरने मोदींशी 'सत्यमेव जयते'च्या आगामी भागातील विषयावरती चर्चा केली.
मोदींनीदेखील आमिरच्या विषयाबरोबरच अनेक असे विषय सुचवले ज्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. यातील अनेक विषय असे आहेत ज्यावर समाजामध्ये कधीच चर्चा घडून येत नाही. आमिरनेदेखील मोदींनी सुचवलेल्या विषयांचे स्वागत केले. यामध्ये महामार्गावर होणारी लूट यासारख्या विषयांचा समावेश आहे. 'सत्यमेव जयते'चा पुढील भाग सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये सुरू होऊ शकतो.