आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर-शाहरुखच्या ट्रेलर्समध्ये होणार सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटांची एक दिवस चित्रपटगृहात धडक झाल्याने निश्चित होते की, कोणत्या सिनेतार्‍यांमध्ये किती ताकद आहे. आता आमिर खान ही ताकद ट्रेलरद्वारे दाखवू इच्छित आहे. शाहरुखच्या 'हॅप्पी न्यू इयर'चा ट्रेलर अजय देवगणच्या 'सिंघम रिटर्न्‍स'सोबत 15 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे. हे माहीत असतानाही त्याने आपल्या 'पीके'चा ट्रेलर याच दिवशी रिलीज करण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईमध्ये आमिर त्या दिवशी लाँचसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. आमिरचा 'धूम-3' 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'चा विक्रम मोडला होता. त्यामुळे आमिर आणि शाहरुख यांच्यातील संबंध काही काळ तणावपूर्ण बनले होते. आता चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञ आणि प्रेक्षकांच्या 'पीके'आणि 'हॅप्पी न्यू इअर'च्या ट्रेलरपैकी कोणत्या चित्रपटाला अधिक चांगल्या प्रतिक्रिया मिळतात, यावर सर्वांचे लक्ष राहणार आहे.