आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरच्या शिकवणुकीवर यशराज फिल्म्सचे मार्गक्रमण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः आमिर खान
गेल्या वर्षी ‘धूम-3’ द्वारे सिनेमा व्यवसायात दोन मोठी नावे उदयास आली होती. सिनेमाचे निर्माता व यशराज बॅनरचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आणि सिनेमाचा प्रमुख अभिनेता आमिर खान. शुटिंगदरम्यान आमिरचे काही गोष्टींवर आदित्यशी मतभेद झाले होते. मात्र, शेवटी सिनेमात चांगला परिणाम दिसून आला. त्यानंतर यशराज बॅनरने आमिरच्या काही खास खास गोष्टी आत्मसात करण्यास सुरुवात केली. आमिरने ‘धूम-3’च्या कथेबाबत गोपनीयता बाळगली होती. सिनेमाच्या प्रचाराच्या कार्यक्रमादरम्यानदेखील सिनेमावर चर्चा करण्यात आली नव्हती.
आदित्यने बॅनरमधील कलावंतांना आमिरचे काही गुण आत्मसात करण्यास सांगितले आहेत. शिवाय आपल्या सिनेमासंबंधी बाहेर चर्चा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमिरच्या ‘लेस इज मोर’ या तंत्राचे महत्त्व कदाचित आदित्यच्या लक्षात आले असावे. आता यशराजमधील हे बदलाचे वारे पाहून सुशांत सिंह राजपूत, परिणीती चोप्रा आणि रणवीर सिंह यशराज बॅनरसोबत आपापल्या आगामी सिनेमांसंबंधी नकारात्मक पद्धतीने चर्चा करत आहेत.