आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Attends Screening Of Mardaani With Wife And Daughter

'मर्दानी'च्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी राणीने किरणची घेतली अशी भेट, पाहा आमिर-इराचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून किरण राव, राणी मुखर्जी आणि इरा खान)
मुंबई: राणी मुखर्जीला नुकताच रिलीज झालेला 'मर्दानी' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 12 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. सिनेमाच्या या प्रदर्शनाने राणीसुध्दा आनंदी आहे. तिने शनिवारी (23 ऑगस्ट) एका स्पशेल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. त्यामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पत्नी किरण राव आणि इरा खानसह पोहोचला होता.
आमिर, किरण आणि इरा तिघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आमिर राणीसाठी एक खास पाहूणा म्हणून आला होता. त्यामुळे त्याला अटेंड करण्यासाठी राणी तिथे उपस्थित होती. राणीने किरणला अलिंगन देऊन भेट घेतली. राणी पंजाबी सूटमध्ये दिसून आली. दुसरीकडे, राणी आमिरसुध्दा एकमेकांना आनंदी दिसले.
'मर्दानी' सिनेमा राणीचा पती आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. सिनेमात राणीच्या पात्राचे नाव शिवानी शिवाजी रॉय आहे. प्रदीप सरकार यांनी सिनेमा दिग्दर्शित केला असून मुलांच्या तस्करीवर आधारित त्याची कहानी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगची छायाचित्रे...