आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने किरण आणि फॅमिलीसोबत केले डिनर, Ex-Wife रीना होती सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[आमिर खान आणि त्याची एक्स-वाइफ रीना दत्ता (वर), खाली मुलगा आझाद राव खानसोबत किरण राव]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता आमिर खान गुरुवारी मुंबईतील एका रेस्तराँमध्ये पोहोचला होता. येथे तो आपल्या कुटुंबासोबत डिनरसाठी आला होता. विशेष म्हणजे यावेळी आमिरची एक्स-वाइफ रीना दत्तासुद्धा त्याच्यासोबत दिसली. आमिरची दुसरी पत्नी किरण रावही या डिनर पार्टीत सहभागी झाली होती. याशिवाय आमिर-रीनाची मुलगी इरा आणि आमिर-किरणचा मुलगा आझाद राव खान हेदेखील त्यांच्यासोबत होते.
आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आमिरने कुटुंबासोबत एकत्र जेवणाची मजा घेतली. आमिर सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी 'दंगल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो दोन तरुण मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत असले. या भूमिकेसाठी आमिर आपले वजनदेखील वाढवत आहे. यावर्षाच्या शेवटीपर्यंत सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढे पाहा, डिनर पार्टीसाठी जाणा-या आमिरची कुटुंबासोबतची छायाचित्रे...