आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी इरामुळे भलताच खुशीत आहे आमिर, जाणून घ्या कारण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या भलताच खुशीत आहे. त्याच्या या आनंदाचे कारण आहे त्याची लाडकी लेक इरा. आमिरची लेक इरा आयसीएससीच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 89 टक्के गुण घेऊन पास झाली आहे. आमिरने इराच्या मार्कशीटचा फोटो मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना पाठवला आहे.
आमिरला इरा बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करून दाखवेल याबाबत अगोदरपासूनच खात्री वाटत होती. इरानेही आपल्या वडिलांच्या आशा कायम ठेवत हे यश मिळवले आहे.
इराच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आमिर तिला स्पेशल ट्रीट देणार आहे. इराच्या आवडत्या ठिकाणी तो तिला फिरायला घेऊन जाणार आहे.