आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धूम-3\' नंतर आमिर खानने वाढवले वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'धूम-3'च्या तयारीसाठी आमिरने स्वत:ची शरीररचना एकदम सडपातळ बनवली होती. मात्र, आता त्याने आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या तो पूर्वीसारखा व्यायाम करत नसून डाएट करणेदेखील त्याने सोडले आहे. त्याच्या वजनात बरीच वाढ झाली असून चेहराही भरलेला दिसतो. आमिरने आगामी चित्रपटासाठी आपल्या शरीररचनेत बदल केला असल्याचा तर्क लावला जात आहे.
'पीके' चित्रपटाच्या रिलीजनंतर आमिर कोणता चित्रपट सर्वप्रथम सुरू करेल, याबाबत अद्याप काहीच माहिती नाही. मात्र, मेथड अँक्टिंगचा काही हिस्सा आजमावण्याचा प्रयत्न करणारा आमिर पुन्हा एकदा असे करू शकतो. 'मंगल पांडे'साठी त्याने केस व मिशा वाढवल्या होत्या. त्यानंतर 'गझनी'साठी मुंडण केले होते आणि सिक्स पॅक अँब्ज बनवले होते.