आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या चित्रपटाने वेगळा प्रयोग झाला, याचा अभिमान'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिरने नेहमीप्रमाणे आपल्या चित्रपटांबाबतचे रहस्य कायम ठेवले आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न करता रविवारी थेट एका चॅनलवर त्याचे प्रसारण करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रदर्शित न झालेल्या आपल्या या चित्रपटाबाबत आमिर खान प्रेक्षकांची मते जाणून घेत आहे. हा चित्रपट 'अँड पिक्चर्स' चॅनलवर रात्री 8 वाजता दाखवण्यात आला. प्रसारित होणार्‍या चित्रपटाचे नावदेखील सांगण्यात आले नाही, ही कदाचित हिंदी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात पहिलीच वेळ असावी. बाकीच्या गोष्टी तर फारच दूर राहिल्या.
आमिर चित्रपटाशी संबंधित माहिती देताना म्हणाला की, 'चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यास कथेचा सार आपोआप कळेल.' त्याने एवढेच सांगितले की, 'चित्रपटादरम्यान एका जोडप्याचे लग्न होते आणि एका जोडप्याचा घटस्फोट होतो.' चित्रपट सत्यकथेवर आधारित असल्याचे त्याचे प्रोमोमधील म्हणणे, यामुळे खरे वाटते. आमिर म्हणतो, 'हा खूपच वेगळा चित्रपट आहे. भारतीय टीव्हीवर यापूर्वी असा चित्रपट कधीच दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे, की हा वेगळा प्रयोग माझ्या एका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाद्वारे झाला.'
चित्रपट तयार होत असताना तो एखाद्या दिवशी प्रदर्शितही होईल यावर विश्वासही नव्हता, अशी कबुली आमिरने दिली. तो म्हणतो, 'या चित्रपटाची निर्मिती केवळ वेडापायी केली होती, पण तो कधी प्रदर्शित होईल याचा विचारही केला नव्हता.' दरम्यान भविष्यात फक्त टीव्हीसाठीच चित्रपटांची निर्मिती करण्याचा मुद्दा आमिर खोडूनही काढत नाही.
तो म्हणतो, 'हे सर्व चित्रपटाच्या कंटेंटवर अवलंबून असते. परदेशातही 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'हाऊस ऑफ कार्डस' सारखे एचबीओचे चित्रपट टीव्हीसाठी बनवले जातात. या चित्रपटांचा दर्जा दुसर्‍या कोणत्याही चित्रपटांपेक्षा कमी नाही. जर मला छोट्या पडद्यासाठी चांगले साहित्य मिळाले तर मी नक्कीच अशा चित्रपटांची निर्मिती करण्यास प्राधान्य देईल. छोटा असो की मोठा पडदा, यामुळे कोणताही फरक पडत नाही. लोकांची आवड सर्वात महत्त्वाची असून ते आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे.'