आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Like Nagraj Manjule Marathi Film Fandry

PICS: आमिरने केले 'फँड्री'चे कौतुक, नागराज मंजुळेंसह घेतली टीमची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळेंच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'फँड्री' या सिनेमाचे सर्व स्तरातून कौतुक होतेय. बॉलिवूड कलाकारांनीही फँड्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बॉलिवुडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री 'फँड्री'च्या प्रेमात पडल्याचे ट्विटरच्या माध्यमातून समोर आले आहे.
अभिनेते नसीरुद्दीन शाह, कल्कि कोचलीन, हुमा कुरैशी, दिव्या दत्ता रजत कपूर यांनी नागराज मंजुळेंच्या या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला होता. आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नावाचीही यात भर पडली आहे.
आमिर खानने पहिले ट्विटरच्या माध्यमातून 'फँड्री'चा फॅन असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमिरने अलीकडेच फँड्रीचे
दिग्दर्शक नागराज मंजुळे, सोमनाथ अवघडे, सूरज पवार यांच्यासह सिनेमाच्या टीमची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे आमिर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील यापूर्वी नागराज मंजुळेंची भेट घेऊन त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आमिर खान आणि 'फँड्री' सिनेमाच्या टीमच्या भेटीची खास छायाचित्रे...
फोटो साभार - फेसबूक