आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी मानधनामुळे आमिरने सोडला दीपिकासोबतचा सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरहानच्या बॅनरच्या एका चित्रपटामध्ये आमिरने 8% नफ्याची मागणी केली होती. फरहान आणि रितेश सिधवानीने आपल्या बॅनरच्या आगामी चित्रपटासाठी आमिर खान आणि दीपिका पदुकोणला प्रस्ताव दिला होता. या चित्रपटाद्वारे आमिर-दीपिका पहिल्यांदाच सोबत दिसणार होते. सुरुवातीला आमिरने या चित्रपटासाठी होकार दिला. त्यापाठोपाठ दीपिकादेखील या टीममध्ये सहभागी झाली. मात्र त्यानंतर अचानकपणे दोघांनीही चित्रपट करण्यास नकार दिला.
चित्रपटाच्या स्क्रिप्टमुळे दोघांनी चित्रपट नाकारला असल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र यामागील खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, आमिर चित्रपटाच्या आर्थिक व्यवहारावर समाधानी नव्हता. चित्रपट व्यवसायामध्ये बहुतांश आघाडीचे नायक मानधनाऐवजी चित्रपटामधील नफ्यामध्ये भागेदारी मागतात. आमिर खानदेखील त्याच यादीतील नायक आहे. फरहान आणि रितेश या चित्रपटाच्या व्यवसायामध्ये भागीदारी देण्यास तयार होते. मात्र आमिरने चित्रपटाच्या कमाईमधील तब्बल ८०% वाटा देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले जाते. आमिरच्या या मागणीवर फरहान आणि रितेशने मात्र काहीच बोलण्यास नकार दिला.