आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांशी बातचीत करताना आमिरला कोसळले रडू, 'सत्यमेव जयते'च्या तिस-या पर्वाला लवकरच सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता आमिर खान)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान 'सत्यमेव जयते' टीव्ही शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्याने सामाजिक विषयांवर आधारित 'सत्यमेव जयते' टीव्ही शोच्या तिस-या पर्वाची घोषणा केली आहे. त्याने सांगितले, शोचे तिसरे पर्वसुध्दा सामाजिक विषयांवरच आधारलेले असेल.
आमिरने माध्यमांशी बोलताना सांगितले, यावेळी 'सत्यमेव जयते'च्या स्वरुपात थोडासा बदल करण्यात आला आहे. शोनंतर तो एक तास विविध शहरांतील लोकांशी लाइव्ह संपर्क साधणार आहे.
आमिरने पुढे सांगितले, की या लाइव्ह बातचीतसाठी विविध शहरांतील सामान्य लोक फेसबुक आणि मोबाइल फोनव्दारा संपर्क साधू शकतील. आमिर त्या लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देईल. माध्यमांशी बातचीत करताना आमिरने 'सत्यमेव जयते'च्या तिस-या पर्वाची घोषणा केली.
यावेळी मागील दोन पर्वात समोर आलेल्या सामाजिक मुद्यांवर बोलताना आमिरला रडू कोसळले. आमिर म्हणाला या तीन वर्षांत जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन बदलला.