आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'PK\'मध्ये आमिरचा भोजपुरी अंदाज, मुलाखतीत उलगडल्या अनेक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता आमिर खान)
मुंबई: अलीकडेच, आमिर खानच्या 'पीके' या आगामी सिनेमाचे दुसरे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सिनेमाच्या पहिल्या आणि दुस-या पोस्टरमध्ये बराच बदल दिसून येत आहे. पहिल्या पोस्टरवर तो विवस्त्र आणि हातात ट्रान्जिस्टर पकडलेला दिसत होता. तसेच दुस-या पोस्टरवर तो अंगभर कपडे आणि हातात बँड पडकलेल्या अवतारात दिसून आला.
दुस-या पोस्टर रिलीजदरम्यान आमिर खान विनोदी मूडमध्ये दिसला. मीडियासोबत बातचीत करताना आमिर म्हणाला, विविध पोस्टर्स रिलीज करून त्याला प्रेक्षकांना कन्फ्यूज करायचे आहे. कारण जोपर्यंत 'पीके' रिलीज होत नाही तोपर्यंत त्याची चर्चा लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळाली पाहिजे. लोकांना पोस्टर्समध्ये गुंतवूण ठेवण्याचा आमिरचा हेतू आहे.
आमिर पुढे म्हणाला, 'आम्ही प्रत्येक आठवड्याला सिनेमाचे वेगवेगळे पोस्टर्स रिलीज करणार आहोत.' 'पीके'च्या पोस्टर्स आणि सिनेमाविषयी आमिरने काही रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्या तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'पीके'विषयी आमिर काय म्हणाला? बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनावर आमिर काय विचार करतो? आणि सलमानला दिले आव्हान...