रविवारी 'अँड पिक्चर्स' चॅनलवर 'मेकिंग ऑफ लगान : चले चलो' पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधील मोठा वर्ग नाराज झाला. चित्रपटाच्या 14 वर्षांच्या मेकिंगमध्ये अनेकांना रस नव्हता. सोशल साइट्सवर आमिरच्या या पद्धतीवर लोकांमध्ये बरीच चर्चा झाली. आमिरने प्रचारादरम्यान हा प्रदर्शित न झालेला चित्रपट असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले.
आपल्या प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाऐवजी आमिर खानने रविवारी रात्री टीव्हीवर 'लगान'चा लघुपट दाखवला. याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला की, प्रेक्षक गोळा करण्यासाठी हा प्रचार करणे गरजेचे होते..
आमिरचा आतापर्यंत 'टाइम मशीन' हा प्रदर्शित न झालेला एकमेव चित्रपट आहे. निर्माता सुरेश मल्होत्राशी मतभेद झाल्यानंतर शेखर यांनी 14 रिळे पूर्ण होऊन देखील चित्रपट डबाबंद केला होता. आमिर कायदेशीर प्रक्रियेतून या चित्रपटाला बाहेर काढत टीव्हीवर प्रदर्शित करत आहे, असे बहुतांश लोकांना वाटले होते. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. प्रीमिअरदरम्यान हा चित्रपट दोन चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता आणि हजार लोकांनी तो पाहिला असल्याचे आमिरने सांगितले. प्रीमिअरनंतर आमिरशी झालेल्या चर्चेचा काही भाग.
काय म्हणाला आमिर जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये....