आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर बनला टेनिस खेळाडू, कोर्टमध्ये गाळला घाम, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सतत व्यग्र राहणा-या स्टार्सपैकी एक आहे. त्याला रिकामे राहणे कधीच आवडत नाही. मात्र, या वर्षी त्याने स्वत:ला शुटिंगपासून दूर ठेवले आहे. तो यावर्षीय केवळ 'पीके'चे शुटिंग करणार आहे. याव्यतिरिक्त तो आपल्या 'सत्यमेव जयते 2' या टीव्ही शोमध्येही व्यस्त होता. परंतु सध्या त्याच्याकडे काही फावला वेळ आहे. त्यामुळे तो त्याचा पूर्ण फायदा घेत आहे. त्याला काल मुंबईमध्ये टेनिस खेळताना बघितल्या गेले आहे. याच्या एक दिवसापूर्वी आमिर जिममध्ये घाम गाळताना दिसला.
बॉलिवूडच्या प्रत्येक स्टार्सला कोणता ना कोणता खेळ आवडतो. शाहरुख कधी-कधी क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावतो. जॉन आणि रणबीरसारखे सुपरस्टार फुटबॉल खेळणे पसंत करतात. आमिर टेनिस खेळणे पसंत करतो. तसे पाहता, त्याला क्रिकेटची फार आवड आहे. तो अनेकदा क्रिकेटचे सामाने बघण्यासाठी मैदानातसुध्दा येतो. परंतु सध्या मिस्टर परफेक्शनिस्ट टेनिसमध्ये शॉट्स लावत आहे.
मुंबईच्या टेनिस कोर्टमध्ये आमिर गडद हिरव्या टी-शर्ट, निळी कॅपमध्ये दिसला. टेनिस खेळताना त्याच्या हातात रिस्ट बँडसुध्दा दिसले. खेळताना आमिर पूर्ण घामाघूम झालेला होता. कोर्टच्या बाहेर पडताना आमिर टॉवेलने आपला घाम पुसताना दिसला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा आमिरची टेनिस खेळतानाची छायाचित्रे...