आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Takes Dig At Salman And Sharukh On PK Second Poster Launch Event

आमिरने दिले सल्लूला विवस्त्र होण्याचे आव्हान, शाहरुखला म्हटले, दुस-यांसाठी खड्डे खोदणारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आमिर खानने आपल्या आगामी 'पीके' आगामी सिनेमाचे दुसरे पोस्टर बुधवारी लाँच केले आहे. यावेळी त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यावर निशाणा साधला. यादरम्यान त्याने पहिल्या पोस्टरवर विवस्त्र होण्यासंबंधितच्या काही गोष्टी शेअर केल्या. तो विनोदी अंदाजात म्हणाला, की सलमानच्या मैत्रीची परिक्षा घेण्यासाठी तो विवस्त्र झाला होता. त्याला पाहायचे होते, की सलमान असे करू शकतो की नाही.
शाहरुखवर निशाणा साधत आमिरने त्याला इतरांसाठी खड्डे खोदणारा व्यक्ती म्हटले. सिनेमाच्या पहिल्या पोस्टर विवस्त्र झळकल्यामागे काहीतरी वेगळे करण्याचा उद्देश होता. प्रत्येक दोन-तीन आठवड्यांनतर 'पीके'चे एक पोस्टर रिलीज केले जाणार आहे. यूट्यूबवर 20 ऑगस्टला दुसरे पोस्टर अपलोड झाल्यापासून त्याला आतापर्यंत 25 हजार लोकांनी पाहिले असून 1120 लाइक्स मिळाले आहेत.
शाहरुखवर केली टिका
पोस्टर लाँचवेळी आमिरने आपल्या विनोदी अंदाजात शाहरुखवर निशाना साधला. शाहरुखने त्याच्या विवस्त्र पोस्टरची खिल्ली उडवली होती, असे आमिरला सांगण्यात आल्यानंतर तो म्हणाला, 'जे दुस-यांसाठी खड्डा खोदून ठेवतात त्यांच्या पदरी काय पडणार. मी अशा लोकांपासून दूर राहतो.'
सलमानला म्हटले नकल करणारा
आमिर म्हणाला, 'धूम 3'साठी मी जी हॅट घातली होती, सलमानने ती बिग बॉसमध्ये घातली आणि आपल्या सिनेमाला प्रमोट केले. त्यामुळे मी सलमानची मैत्री पडताळून पाहण्याचा विचार केला. म्हणून 'पीके'च्या पहिल्या पोस्टरवर विवस्त्र झालो. सलमान आता काय करणार हे बघण्याची माझी इच्छा होती. तो माझ्या मैत्रीच्या परिक्षेत पास होतो की नाही.'
प्रत्येक दोन-तीन आठवड्यात नवीन पोस्टर करणार लाँच
आमिर म्हणाला 'पीके'च्या पहिल्या पोस्टरपासून त्यांना जी प्रसिध्दी हवी ती मिळाली आहे. 'सामान्यत: सिनेमाचे प्रोमो रिलीज केले जातात. परंतु आम्ही सिनेमाच्या पोस्टर्सची सीरीज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रत्येक दोन ते तीन आठवड्यानंतर एक नवीन पोस्टर लाँच करणार आहोत. प्रत्येक पोस्टरमध्ये मी वेग-वेगळ्या रुपात दिसणार आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवीन रिलीज झालेले 'पीके'चे पोस्टरसह मागील काही पोस्टर्स...