आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PKनंतर अॅक्शन-ड्रामा सिनेमा करणार आमिर, वर्कआउटवर देतोय जोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः वर्कआउट करताना आमिर खान)

राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनीत 'पीके' हा सिनेमा येत्या 19 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. वर्षाला एक सिनेमा करणारा आमिर 'पीके'नंतर कोणत्या सिनेमात झळकणार याची उत्सुकता नक्कीच त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.
'पीके'नंतर आमिरने एक अॅक्शन ड्रामा सिनेमा साइन केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी म्हणे आमिरने जोमाने वर्कआउटसुद्धा सुरु केले आहे. दक्षिणेचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदार हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचे समजते.
आमिर आपल्या या नवीन सिनेमाविषयी कमालीची गुप्तता बाळगून आहे. जेव्हा त्याला त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी विचारणा झाली तेव्हा त्याने अद्याप नवीन स्क्रिप्ट वाचत असून कोणताही सिनेमा साइन केला नसल्याचे म्हटले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पीके'वरुन प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी आमिर आपल्या नवीन सिनेमाविषयी काहीही बोलत नाहीये. मात्र सध्या हेवी वर्कआउट करत असून ते करण्यात मजा येतेय, असे आमिरने सांगितले.