आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांपूर्वीची इच्छा आमिर खान प्रत्यक्षात उतरवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाने कितीही मोठे यश मिळवले, तरी त्याच्या अशा काही इच्छा असतात ज्या अपूर्ण राहिल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी त्याची कायम तळमळ असते. अशीच एक अपूर्ण इच्छा चित्रपट सृष्टीत मिस्टर परफेक्शनस्टि म्हणून ओळख असलेल्या आमिर खानची आहे आणि तीदेखील तब्बल 20 वर्षांपूर्वीची.
सध्या आमिरने आपली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक राम माधवानी एका सायन्स-फिक्शन चित्रपटाची कथा लिहीत आहेत. या चित्रपटाची कल्पना आमिरला आवडली असून कथा ऐकण्यास आपण इच्छुक असल्याचे त्याने सांगितले आहे. सध्या आमिर 'सत्यमेव जयते -2' कार्यक्रमाच्या पुढील भागावर काम करत आहे. यादरम्यान त्याला अनेक चित्रपटांचे प्रस्ताव आले. मात्र, त्यातील स्क्रिप्ट काही पसंत पडली नाही. सूत्रांनुसार हा साय-फाय चित्रपट आमिरच्या 20 वर्षांपूर्वीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवू शकत असल्याने त्याने या चित्रपटात रस दाखवला आहे.
खरे तर 90च्या दशकामध्ये दिग्दर्शक शेखर कपूर यांनी 'टाइम मशीन' चित्रपट बनवणे सुरू केले होते. या चित्रपटात आमिर प्रमुख भूमिकेत होता, तर नसिरुद्दीन शाह आणि रेखा त्याच्या आई-वडिलांची भूमिका साकारत होते. चित्रपट 13 रीलपर्यंत बनला होता आणि केवळ 10 दिवसांचे शूटिंग बाकी होते. यादरम्यान निर्माता सुरेश मल्होत्रा आणि शेखर कपूर यांच्यामध्ये पैशावरुन वाद झाला आणि चित्रपट डबाबंद होण्याबरोबरच आमिरची इच्छा अपूर्ण राहिली होती. तेव्हापासून त्याची साय-फाय चित्रपटात काम करण्याची इच्छा होती.