आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान करणार टायगरच्या सिनेमाचे ट्रेलर लाँच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर 'हीरोपंती' या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला परफेक्ट लाँच मिळणार आहे. 23 मे रोजी रिलीज होणा-या या सिनेमाचा फस्ट लूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहेत. जवळच्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, की हे लाँचिंग दुसरे-तिसरे कुणी नाही तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान करणार आहे. सांगितले जात आहे, की सिनेमाच्या टीमला फस्ट लूक मोठ्या स्टेजवर लाँच करण्याची इच्छा आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, जेव्हा यावर चर्चा झाली तेव्हा टीमसोबतच जॅकी श्रॉफ यांनीसुध्दा लाँचिंगच्या कार्यक्रमासाठी आमिरचीच निवड केली होती. जॅकी आणि आमिर हे प्रोफेशनल तसेच खासगी आयुष्यातसुध्दा चांगले मित्र आहेत. म्हणून आमिरला जॅकी यांनी जेव्हा या कार्यक्रमाची ऑफर दिली तेव्हा त्याने ती आनंदाने स्वीकार केली.
ट्रेलर लाँचिंगच्या कार्यक्रमात आमिर सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगसोबतच पहिल्यांदाच प्रेक्षक आणि माध्यमांना समोर टायगरची ओळख करून देणार आहे. टायगर यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलेला नाही. म्हणून ही त्याच्यासाठीसुध्दा एक मोठी संधी आहे.